आग्रात बांधण्यात येणाऱ्या एका मुघल संग्रहालयाला मुघलांचं नाही तर, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं असल्याचं उदयनराजे भोसलेंनी म्हटलं आहे. असं ट्विट करुन उदयनराजेंनी योगींचे आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. pic.twitter.com/8VzUycltWa
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 15, 2020
दरम्यान, नवीन उत्तर प्रदेशात गुलामीच्या प्रतिकांना कोणतेही स्थान नाही, आता ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे ओळखली जाईल. असं आदित्यनाथ योगींनी ट्विट करुन म्हणले होते.
आगरा में निर्माणाधीन म्यूजियम को छत्रपति शिवाजी महाराज के नाम से जाना जाएगा।
आपके नए उत्तर प्रदेश में गुलामी की मानसिकता के प्रतीक चिन्हों का कोई स्थान नहीं।
हम सबके नायक शिवाजी महाराज हैं।
जय हिन्द, जय भारत।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 14, 2020