उत्तर प्रदेशातुन दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. बलात्कार आणि गुन्हेगारीत उत्तर प्रदेश पहील्या ३ राज्यांमध्ये येते, राज्यातील पोलीस यंत्रणेवर वारंवार देशभरातुन प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र उत्तर पोलिस प्रशासन यासाठी पोलिसांची विशेष तुकडी तयार करणार आहे. मात्र या तुकडीला दिल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे देशभरातुन यावर टिका होत आहे.
उत्तर प्रदेश सरकारने रविवारी राज्यात एक नवीन विशेष सुरक्षा बल स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं. ही संस्था केंद्र सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षाबल (सीआईएसएफ) च्या तोडीची असेल. ही संस्था कुणालाही विनावॉरंट अटक करू शकते आणि झडती देखील घेऊ शकते, असं सरकारने ट्विटरवरून ट्विट करून सांगितलं.
UP DGP told to draw up plan for new special force in 3 days.
The Government aims to form the force in the next three months with 9,900 personnel in the first month. pic.twitter.com/MIEEQGAsHd
— Government of UP (@UPGovt) September 14, 2020
या ट्विटमध्ये सांगितलं आहे की, संस्थेचं काम न्यायालयं, एअरपोर्ट, शासकीय न्यायालयं, मेट्रो, बॅंक आणि अन्य कार्यालयांची सुरक्षा करणं असेल. या संस्थेसाठी 1747.06 कोटी रूपये एवढा अंदाजे खर्च होईल, ज्यामध्ये वेतन भत्ता आणि अन्य व्यवस्था समाविष्ट असतील.
महत्वाच्या संस्थेच्या सुरक्षेसाठी सध्या 9,919 एवढे अधिकारी कार्यरत असतील. सूरूवातीच्या टप्प्यात यासाठी पाच तुकड्या नेमण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी 1,913 पदं असणार आहेत.
मात्र सरकारच्या या अशा धोरणांमुळे या अधिकारांचा दुरुपयोग होऊ शकतो, असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. सरकारच्या या निर्णयावर मात्र अनेक प्रश्न ऊभे राहत आहेत.