यूएई येथे 19 सप्टेंबरपासून आयपीएल सुरू होणार आहे. 13 व्या सीझनची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाच्या सामन्याने होणार आहे. मात्र या अगोदरच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर चर्चेत आला आहे. सध्या मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूंसोबत अर्जुन तेंडुलकरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे लोकांना वाटत आहे की अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा भाग असून पुढच्या सीजन पासून तो आयपीएलमध्ये खेळेल.
https://www.instagram.com/p/CFHlYugBoaH/?igshid=o4sc2sxze94w
13 व्या सीझनची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या संघाच्या सामन्याने होणार आहे. यासाठी दोन्ही संघांकडून कसून सराव केला जात आहे. सोमवारी मुंबई इंडियन्सचा लेगस्पिनर राहुल चाहरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोज राहुल चाहर सोबत ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅंटीसन आणि सौरभ तिवारी हे मुंबई इंडियन्स खेळाडू होते. मात्र लोकांचं लक्ष दुसऱ्याच खेळाडूने वेधून घेतलं होतं तो म्हणजे अर्जुन तेंडुलकर.
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत अर्जुन तेंडुलकर दिसल्याने लोकांना वाटले की अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून खेळेल. मात्र अर्जुन तेंडुलकर नेट गोलंदाज म्हणून मुंबई इंडियन्स सोबत दुबईला गेला आहे. नेटमध्ये सराव करत असताना गोलंदाजी करण्यासाठी अर्जुन तेंडुलकर सोबत गेला आहे आयपीएल मधील प्रत्येक संघांनी आपल्या सोबत अशा प्रकारचे नेट गोलंदाज घेऊन गेले आहेत. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा ही फक्त अफवा आहे.