येत्या ३० सप्टेंबरला बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी न्यायाधीश एस.के.यादव यांनी लालकृष्ण आडवाणींसह इतर आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
हा निकाल लखनऊचे विशेष सीबीआय कोर्ट देणार असून येत्या ३० सप्टेंबरला बाबरी मशीद पाडल्याप्रकरणात निकाल देण्यात येणार आहे.
मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देण्यासाठी लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्टाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली होती.
या प्रकरणात पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपा नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतुंभरा यांसह इतर ३२ आरोपी आहेत.
काय आहे प्रकरण?
६ डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांकडून अयोध्येत बाबरी मशिद पाडण्यात आली होती. त्यावेळी लालकृष्ण आडवणी, मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे वरिष्ठ नेते राम जन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करत होते.
यानंतर आडवाणी-जोशींशिवाय विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि मशीद पाडणाऱ्या कार सेवकांविरोधात एफआयआर ची नोंद झाली होती.
बचाव आणि अभियोग पक्षाचा युक्तीवाद एक सप्टेंबर रोजी संपल्यानंतर या खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीशांनी निकाल लिहायला सुरुवात केली. या प्रकरणात सीबीआयने न्यायालयासमोर ३५१ साक्षीदार आणि पुरावा म्हणून ६०० कागदपत्रे सादर केले आहेत