देशात कोरोनाने थैमान घातलं असताना बेरोजगारी प्रचंड वाढली होती. करोडो लोकांना पगारी नोकर्यांवरून कमी करण्यात आलं आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने तरुण-तरूणींसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
महाराष्ट्रात लवकरच पोलीस दलातील ‘पोलीस शिपाई’ या पदासाठी भरती निघणार आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची घोषणा केली. ते म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस दलात ‘पोलीस शिपाई’ या पदासाठी 12,538 जागांची भरती काढण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पोलीस भरतीचा मार्ग तरुणांसाठी मोकळा झाला आहे.
तसेच पत्रकारांसोबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की रिक्त जागांच्या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. तसंच तरुण आणि तरुणींना परीक्षेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
मराठा समाज आणि पोलीस भरती
पोलीस भरतीची बातमी तरुणांसाठी आनंदाची असली तरी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप अद्याप स्पष्ट नाही. अगोदर लेखी परीक्षा होणार की मैदान हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. तसंच मराठा समाजातील तरुण-तरुणींना या भरती प्रक्रियेत आरक्षणाचा लाभ मिळणार का, याबाबतही अजून स्पष्टता नाही.