मागील वर्षी झारखंड येथे तबरेज अंन्सारी या युवकाची चोरीच्या आरोपावरुन जमावाने झाडाला बाधुन मारल्याची घटना घडली होती. मात्र तरबेजला दवाखान्यात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाले होते. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर प्रसारित झाला होतो. यात जमावातील काही तरुण तबरेजला काठीने मारत असल्याची दृश्ये होती.
मात्र तरी देखील, या प्रकरणातील ६ आरोपींना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. झारखंड उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. मुखोपाध्याय यांच्या खंडपीठाने भीमसेन मंडल, चमू नायक, महेश महाली, सत्यनारायण नायक, मदन नायक, विक्रम मंडळाला या आरोपींना सहा महिन्यांनंतर जामीन मंजूर केला.
आरोपींच्या वकीलांनी असा दावा केला आहे की, १८ जुन २०१९ रोजी तरबेज अंसारी याला पोलिसांनी चोरीच्या आोरीपाखाली अटक केली. यानंतर २२ जुन रोजी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला दवाखान्यात नेण्यात आलं, आणि मग उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यु मारहाणीने नाही तर हर्ट अॅटकने झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
दरम्यान, तबरेजच्या लिंचिंग होतानाचा व्हिडीओ संपुर्ण देशभरात व्हायरल झालेला असल्याने, या निकालावर संपुर्ण देशभरातुन संतप्त प्रतिक्रीया येत आहेत.