देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 17 सप्टेंबरला वाढदिवस आहे. या दिवशी नरेंद्र मोदी हे सत्तर वर्षाचे झाले आहेत. मात्र या निमित्त सोशल मीडियावर ‘राष्ट्रीय बेरोजगारी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय. देशातल्या तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हा ट्रेंड सोशल मिडीयावर सुरु झालेला आहे.
राहूल गांधींनी देखील यावर ट्विट करुन प्रतिक्रीया दिली आहे.
२०१४ साली भाजप सरकार हे मोदींचा चेहरा दाखवून सत्तेत आले होते. सत्तेत येण्याआधी भाजप पक्षाने देशाला २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिले होते. मात्र मोदींच्या कार्यकाळाची दुसरी टर्म सुरु होऊन देखील रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही. या विरोधात देशातील संतप्त तरुणांनी सोशल मिडीयावर हा ट्रेंड चालवला आहे. यासोबत नुकत्याच केंद्र सरकारने २६ सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत.
दरम्यान, भारताचा जीडीपी दर देखील उणे २३ % एवढा घसरलेला आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे देशातील लाखो लोकांना आपले जॉब सोडावे लागले आहेत. मात्र सरकार या प्रश्नांवर काहीच उपाययोजना करत नसल्याने याविरोधात पंतप्रधान मोदींचा वाढदिवस निषेध म्हणून बेरोजगारी दिवस साजरा केला जातोय.