जगभरात कोरोना लसीचे संशोधन सुरू असून रशियाने ‘स्पुटनिक व्ही’ लसीच्या चाचण्या सुरू आहेत. परंतु या लसीचा डोस घेतल्यानंतर सातपैकी एका स्वयंसेवकामध्ये साइड इफेक्ट आढळून येत असल्याची माहिती ‘द मॉस्को टाइम्स’ने या वृत्ताने दिली आहे.
या लसीचा डोस घेतल्यानंतर अशक्तपणा, स्नायूंमध्ये वेदना असे या साइड इफेक्ट आढळून आले आहे. सध्या हजारो स्वयंसेवकांवर ‘स्पुटनिक व्ही’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे.
तर ४० हजारपैकी आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त जणांना या लशीचे डोस देण्यात आले आहेत. तिसऱ्या फेजमध्ये ४० हजार स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येईल असे रशियाने जाहीर केले होते.
पण या लसीमुळे जवळपास १४ टक्के लोकांनी अशक्तपणा आणि स्नायुंमध्ये वेदनेची तक्रार केली आहे. २४ तासांसाठी त्यांना हा त्रास जाणवला तसेच शरीराचे तापमान सुद्धा वाढले असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, स्पुटनिक व्ही लस ही भारतात ही लवकरच उपलब्ध होणार असून रशियाने डॉ. रेड्डी यांच्या बरोबर करार केला आहे. यासाठी डॉ. रेड्डी लॅबला रशिया स्पुटनिक व्ही लशीचे ट्रायल म्हणजे चाचणी आणि वितरणासाठी १० कोटी डोस देणार आहे. लशीची मानवी चाचणी म्हणजे क्लिनिकल ट्रायल आणि भारतात वितरणासाठी डॉ. रेड्डी लॅबला सहकार्य करणार असल्याचे RDIF ने सांगितले.