सध्या कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुणे यासारख्या उपाय केले जात आहे. तसंच कोरोनावर लस निघावी यासाठी जगभरात प्रयत्न चालू आहेत
आता सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे प्रमुख रॉबर्ट रेडफिल्ड यांनी कोरोना, कोरोनाची लस आणि मास्कचा वापर यावर सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या लसीपेक्षा मास्क माझं जास्त संरक्षण करू शकतो. त्यामुळे कोरोनाची लस खरंच प्रभावशाली असेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लसीपेक्षा मास्क जास्त प्रभावी
रॉबर्ट रेडफिल्ड म्हणाले की कोरोनाची लस किती परिणामकारक असेल हे आपल्याला माहित नाही. तसंच एफडीएकडून लसीला मान्यता मिळण्यासाठी ती 50% प्रभावी असावी लागते. येत्या काळात ज्या कोरोनाच्या लसी येणार आहेत त्या पन्नास टक्क्यापेक्षा थोड्या प्रमाणात प्रभावी ठरतील, असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे संपूर्णपणे लसीवर अवलंबून न राहता मास्कचा वापर करावा लागणार आहे.
मास्कचा वापर केला नाही तर संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरेल
एवढेच नव्हे, तर ते म्हणाले की कोरोना विरोधात लढण्यासाठी आपण मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनीटायझर यासारख्या उपायांचा वापर करत आहे. जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा मास्कचा वापर केला तर कोरोनाचं संक्रमण कमी प्रमाणात होईल. पण जर आपण पूर्णपणे लसीवर अवलंबून राहिलो आणि मास्कचा वापर केला नाही तर हे संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरेल. तसंच रॉबर्ट म्हणाले की जर लस 60 टक्केच प्रभावी असेल तर कोरोनाचं संक्रमण मोठ्या प्रमाणात होईल.
जरी कोरोनाची लस निघाली तरी मास्कचा वापर का गरजेचा आहे हे समजण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं. ते म्हणाले की लोक जेव्हा शरीरावर सनस्क्रीन लावतात आणि उन्हात जाऊन बसतात, तरी देखील त्यांना उन्हाचा काही प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे संपूर्णपणे सनस्क्रीनवर अवलंबून न राहता अंग झाकण्यासाठी कपडे परिधान करायला हवीत. अगदी त्याचप्रकारे जरी कोरोनाची लस निघाली तरी आवश्यक ती काळजी घ्यावी लागणार आहे, असं देखील ते म्हणाले.
अमेरिकन जनतेकडून वक्तव्याचा समाचार
मात्र अमेरिकेतील जनतेने या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यानंतर रॉबर्ट रेडफिल्ड यांनी ट्विट करून आपण पूर्णपणे लसीच्या समर्थनात आहे याची ग्वाही अमेरिकेतील जनतेला दिली.
I 100% believe in the importance of vaccines and the importance in particular of a #COVID19 vaccine. A COVID-19 vaccine is the thing that will get Americans back to normal everyday life.
— Rochelle Walensky, MD, MPH (@CDCDirector) September 16, 2020
त्याचबरोबर कोरोनाच्या लसीमुळेचं अमेरिकन लोकांचे जीवन पूर्वपदावर येणार असल्याचे देखील मान्य केलं.