दोन महीन्यांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएल स्पर्धेचा काल पहिला सामना होता. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात हा पहिला सामना रंगला होता.
चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्स संघाने फलंदाजी करत १६२ धावा केल्या तर ९ विकेट गमावले.
चेन्नई सुपर किंग्जने ५ विकेट गमावत १६६ धावा काढून सामना विजयी केला. या सामन्या बरोबरच २०२० आयपीएलचा पहिलाच सामना जिंकून कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने एक नवीन विक्रम नोंदविला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल मधील १०० सामने जिंकून इतिहास केला. आणखी एक विक्रम म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पुणे वॉरीयर्सने ५ सामने तर चेन्नई सुपर किंग्जने १०० सामने जिंकले आहेत. आयपीएल मधील १०५ सामने जिंकणारा पहिलाच यशस्वी कप्तान म्हणून महेंद्रसिंग धोनीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जचे १६५ सामने झाले असून त्यापैकी १०० सामने या संघाने जिंकली. तर ६४ सामने पराभवी झाले आहेत.
दरम्यान याआधी १०० सामने जिंकण्याचा विक्रम मुंबई इंडीयन्स संघाने केला आहे. पुढील सामना आज सायंकाळी ७:३० वाजता दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघात आहे.