जागतिक आरोग्य संघटनेने अल्जेरिया आणि अर्जेटिना या देशांना मलेरिया मुक्त देश घोषित केले आहे. यापूर्वी अल्जेरियामध्ये मलेरियाच्या शेवटच्या रुग्णाची नोंद 2013 मध्ये तर अर्जेटिनामध्ये 2010 मध्ये झाली होती. मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेला अल्जेरिया हा आफ्रिकेतील दुसरा देश आहे.
यापूर्वी मॉरिशस या आफ्रिकन देशाला 1973 मध्ये मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले होते. मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेला अर्जेटिना हा दक्षिण अमेरिकेतील दुसरा देश आहे. यापूर्वी पराग्वे या दक्षिण अमेरिकन देशाला जून 2018 मध्ये मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले होते. आत्तापर्यंत 36 देशांना मलेरिया मुक्त असल्याचे प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेद्वारा मिळाले आहे.
हिवताप (मलेरिया) : उष्णकटिबंधीय प्रदेशांतील प्रोटोझोआ या एककोशिकीय सूक्ष्मजीवामुळे (प्लाझमोडियम प्रकारातील) होणारा आणि डासांकडून पसरविला जाणारा हिवताप हा एक महत्त्वाचा रोग आहे. ॲनोफिल्स डासाची मादी चावल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो. परजीवी रोगाविरुद्ध जगातील पहिली लस मॉस्किरिक्स किंवा (RTS,S). जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल हा आहे.
मलेरिया निर्मूलनासाठी “मेरा इंडिया” 2030 सालापर्यंत भारतातून मलेरियाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ने (ICMR) 25 एप्रिल 2019 रोजी जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने ‘मेरा इंडिया’ उपक्रम सुरू केला. मलेरिया निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या भागीदारांचा हा एक सामूहिक गट आहे
उद्देश : 2030 पर्यंत भारतातून मलेरिया निर्मूलन करण्यासाठी आणि लोकसंख्येला असणारा मलेरियाचा धोका कमी करण्यासाठी समन्वयित संशोधनाला प्राधान्य देणे