कोरोनामुळे अतिम वर्षाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परीक्षा उशिरा झाल्याचा परिणाण पुर्ण शैक्षणिक वर्षावर झालेला आहे. याबद्दल विद्यापीठ अनुदान आयोग यांनी याबद्दल माहीती कळवली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने(UGC) 2020-21 या शैक्षणिक वर्षाचे पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहिर केलं आहे. यानुसार येणाऱ्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थांचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबर ते २९ ऑगस्ट असे ठरवण्यात आले आहे.
या वेळापत्राकानुसार पहिले सिमिस्टर 1 नोहेंबरपासून 4 एप्रिलपर्यंत असेल व दुसरे सिमिस्टर 5 एप्रिलपासून ते 29 ऑगस्टपर्यंत असेल, असं यूसीजीतर्फे स्पष्ट केलं आहे. मात्र विद्यार्थांना दिवाळी आणि उन्हाळ्यात मिळणाऱ्या सुट्ट्या कमी करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आले आहे.