देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करणं गरजेचं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारताची कोरोना चाचणी क्षमता वाढली असून दिवसाला 12 लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.
‘भारतात आतापर्यंत 6.5 कोटींपेक्षा कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. जेवढ्या जास्त चाचण्या तेवढं लवकर कोरोना रुग्णांना शोधता येऊ शकतं आणि उपचार केले जाऊ शकतात’, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
India's testing capacity has surged to more than 12L daily tests.
Higher than 6.5 cr total tests have been conducted across the country. pic.twitter.com/BHak3pZ1PW
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) September 23, 2020
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मंगळवारी 75 हजार 83 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर 1053 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतात कोरोना रुग्णांची संख्या 52 लाख 62 हजार 664 इतकी झाली आहे.