राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात अनोखी खेळी केली आहे. या सामन्याच त्याने केवळ दोन चेंडूत तब्बल २७ धावा काढल्या आहेत.
चेन्नईचा गोलंदाज एंगिडी याला आर्चरने पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर सलग दोन षटकार मारले. त्याने तिसर्या बॉलवर सुद्धा षटकार मारला मात्र तो नो बॉल होता, यामुळे तो बॉल फ्री हिट मिळाला. एंगिडीला हा चेंडु परत टाकावा लागला. मात्र या बॉलवर सुद्धा जोफ्रा आर्चरने शानदार षटकार मारला. या दोन चेंडूत एका वाईड बॉलचा देखील समावेश होता.
त्याचबरोबर जोफ्रा आर्चरने ४ बॉल ४ षटकार मारत ६ बॉलमध्ये ३० धावा काढल्या. याच जोरावर राजस्थानने या सामन्यात चेन्नईचा १६ धावांना पराभव केला.