आजचं म्हणजे २४ सप्टेंबरचं गुगलचं डुडल तुम्ही पाहिलं असेल, तर तुम्हाला त्या डुडलमध्ये कोण आहे? हा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर आपण जाणून घेऊया काय आहे हे डुडल?
तर गूगलने हे डुडल भारताच्या दिवंगत जलतरणपटू आणि भारताचं ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधितत्व करणाऱ्या आरती साहा यांचा गौरव करण्यासाठी बनवलं आहे. त्यांचा आज ८० वा वाढदिवस असता. इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. २९ सप्टेंबर १९५९ यादिवशी त्यांनी खाडी पार केली होती. त्यांनी यावेळी तब्बल ४३ मैलाचं अंतर पार केलं होतं.
आरती यांचा जन्म एका बंगाली कुटुंबात झाला होता. त्यांच्या पोहण्याच्या आवडीमुळे त्या वयाच्या ११ व्या वर्षी जलतरणपटू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांच्यावर १९४९ मध्ये सर्वात वेगवान जलतरणपटू म्हणून नाव नोंदवणे, १९५१ मध्ये झालेल्या स्पर्धेत डॉली नाझीर यांचे विक्रम विक्रम तोडणे अशा गोष्टींचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या याच दोन महिला होत्या.
गूगलवर झळकणारं हे डुडल कोलकात्यामधील लावंण्या नायडू यांनी काढलंय. आयुष्यात किती संकटे आली तरी मोठी स्वप्न पाहणाऱ्या लोकांना हे डुडल प्रेरणा देईल असं मत लावंण्या यांनी व्यक्त केलं आहे.
१९५३ सालच्या बुटलीन इंटरनॅशनल क्रॉस चॅनेल स्विमिंग रेसमध्ये जाण्यासाठी त्यांना आर्थिक अडचण येत होती, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आरती यांना मदत केली होती. आरती या आपल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून खूप सर्व करायच्या. एकदा त्यांनी देशबंधू पार्कमधील तलावात आठ तास तेही सलग पोहण्याच्या विक्रम केला होता. त्यानंतर एकदा १५ तास पोहण्याचा देखील सराव केला होता.
२४ जुलै १९५९ रोजी त्यांनी इंग्लिश खडी पोहण्याच्या पहिल्या प्रयत्नात त्या अपयशी झाल्या, मात्र २९ सप्टेंबर १९५९ या दिवशी केलेल्या दुसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. त्यांनी ४२ मैल एवढं अंतर १६ तास २० मिनिटं एवढ्या वेळात पोहून पूर्ण केलं आणि तेथील किनाऱ्यावर भारताचा झेंडा फडकवला.
१९६० मध्ये त्यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं आणि त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाने तिकीटही काढलं होतं.
आरती या नंतर रेल्वे मध्ये कामाला लागल्या आणि४ ऑगस्ट १९९४ रोजी त्यांचा मृत्यू झाला. तर या आरती नायडू यांचं हे चित्र त्यांच्या जयंतीनिमित्त गूगलवर झळकत आहे.