पुण्यातील शिवाजीनगर येथुन ३३ वर्षीय महीला गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. या विरोधात घरच्यांनी रुग्णालयासमोर उपोषण सुरु केला आहे.
२९ ऑगस्ट रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथे जम्बो रुग्णालयात प्रिया गायकवाड यांना दाखल करण्यात आले होत. यानंतर आजच्या दिवसापर्यंत प्रिया गायकवाड ह्या बेपत्ता आहेत.
हॉस्पिटल प्रशासनाची संपर्क साधल्यास त्यांनी प्रिया यांना डिसचार्ज देण्यात असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र प्रिया यांच्यासोबत घरचे कुणीच नसतानो पेशंटला एकट्याला कसं सोडलं असा प्रश्न घरच्यांकडुन विचारला जात आहे. याउलट प्रिया यांची रुग्णालयात जातानाची नोंद आहे मात्र बाहेर पडतानाची का नाही असा देखील प्रश्न घरच्यांकडून विचाराला जात आहे.
आमची मुलगी जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत अशी भुमिका घरच्यांनी घेतलेली आहे. मात्र जंबो रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.