आयपीएलच्या १३ व्या हंगामातील सहावा सामना काल झाला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघात होता. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबच्या संघाने फक्त ३ विकेट्स गमावत तब्बल २०६ धावा काढल्या.
पंजाबचा सलामीवीर खेळाडू आणि पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुलने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा काढून विक्रम केला आहे. ह्या धावा काढताना राहुलने ७ षटकार व १४ चौकार मारले. २०२० च्या आयपीएलमध्ये पहिले शतक मारणारा राहुल पहिलाच खेळाडू ठरला आहे. राहुलने आतापर्यंत आयपीएलमध्ये ६९ सामने खेळले असून त्यात त्याने २१३० धावा केल्या आहेत. या धावा करताना राहुलने २ शतके आणि १६ अर्धशतके आहेत.
दरम्यान याच संघात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चे कर्णधार विराट कोहलीने राहुलचे दोन कॅच सोडून बंगलोर संघाला पराभवाचा मोठा झटका दिला. बंगलोरचा संघ १०९ धावांवर ऑलआऊट झाला. पंजाबचा संघ ९७ धावांनी विजयी झाला असून सध्या आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये पहील्या स्थानावर आहे.