संपूर्ण जग कोरोना लसीची वाट बघत असताना WHO ने लस येण्याअगोदर जगभरात २० लाख मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली आहे.
माईक रेयान UN एजन्सीच्या इमर्जन्सी प्रोग्रामचे प्रमुख यांनीही ही भीती व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरसची बाधा होऊन मागील ९ महिन्यांमध्ये ९.९३ लाख लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान सध्याच्या घडीला जगभरात करोनाची बाधा झालेले रुग्ण हे ३ कोटी २० लाखांपेक्षा जास्त आहेत. अश्यात कोरोनामुळे २० लाख मृत्यू जगभरात होऊ शकतात असंही रेयान यांनी म्हटलं आहे.
सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यासोबत अमेरिकेत ७० लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण झाले आहे तर भारतात एकूण रुग्णांची संख्या ५९ लाखांवर पोहचली आहे.