जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोनाचा मृत्यूदर जरी कमी असला तरी त्याचा संसर्ग वेगाने होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोनामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. आता जगात 3 कोटी 33 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना रुग्णांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर
सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका देश पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत 71 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले असून 2 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर भारत असून भारतात आतापर्यंत 61.5 लाखांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. आशादायक बाब म्हणजे अमेरिकेच्या तुलनेत फक्त 96, 318 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांच्या यादीत ब्राझील देश तिसऱ्या क्रमांकावर असून या देशात आतापर्यंत 47.5 लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यात एक लाख 42 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
भारताची कोरोना आकडेवारी
भारतात आतापर्यंत 61.5 लाखांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 51 लाखांपेक्षा जास्त लोक रिकव्हर झाले आहे. भारतात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांना बसला आहे.
महाराष्ट्राची कोरोना आकडेवारी
महाराष्ट्रात 13 लाख 4 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 10 लाख 3 हजार लोक रिकव्हर झाले असून 35,571 जणांचा मृत्यू झाला आहे.
ही आकडेवारी 29 सप्टेंबर 2020 सकाळी 10 वाजता घेतलेली आहे