उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या 19 वर्षीय दलित युवतीचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील कायदा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात पीडितेच्या घरच्यांची परवानगी न घेता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हाथरस पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत या आरोपांना उत्तर दिलं आहे. पोलिसांनी ट्विट करत ही बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे. घरच्यांच्या परवानगीनेच युवतीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती हाथरस पोलिसांनी दिली आहे.
‼️खण्डन/Denial‼️
— HATHRAS POLICE (@hathraspolice) September 29, 2020
➡️ कतिपय सोशल मीडिया के माध्यम से यह असत्य खबर सार्वजनिक रुप से फैलायी जा रही है कि “थाना चन्दपा क्षेत्रान्तर्गत दुर्भाग्यपूर्ण घटित घटना में मृतिका की जीभ काटी गयी, आँख फोडी गयी तथा रीढ की हड्डी तोड दी गयी थी
हाथरस पुलिस इस असत्य एवं भ्रामक खबर का खंडन करती है pic.twitter.com/tyBTi1xZhp
त्याचबरोबर अनेक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार पीडितेने घडलेली हकीकत लोकांना सांगू नये, म्हणून तिची जीभ कापण्यात आली, अशी बातमी दिली आहे. तिच्या मनक्याचं हाड देखील मोडल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचा हाथरस पोलिसांचा दावा आहे.
हे पण वाचा: ‘मला माझ्या मुलीचा चेहरा ही पाहू दिला नाही’ हाथरस प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया
▶️कतिपय सोशल मीडिया के माध्यम से यह असत्य खबर फैलायी जा रही है कि “थाना चन्दपा क्षेत्रान्तर्गत दुर्भाग्यपूर्ण घटित घटना में मृतिका के शव का अन्तिम संस्कार बिना परिजनों की अनुमति के पुलिस ने जबरन रात में करा दिया हैं “।
— HATHRAS POLICE (@hathraspolice) September 30, 2020
⏹️ हाथरस पुलिस इस असत्य एवं भ्रामक खबर का खंडन करती है। pic.twitter.com/EMHLRQzR2o
पोलिसांनी ट्विट करून सांगितलं आहे की आरोपींनी युवतीचा गळा दाबल्यामुळे मणक्याच्या हाडाला जखम झाली होती. तसंच गळा दाबताना जीभ दाताखाली आल्याने जिभेवर जखम झालेली दिसून येत आहे. त्यामुळे मणक्याचं हाड मोडलं किंवा जीभ कापली या गोष्टी खोट्या आहेत. अशा अफवांपासून सावध राहा असे देखील त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.