सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी अंतिम वर्षाची परीक्षा एका आठवड्याने पुढे ढकलली आहे. ही परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच तारखेपासून घेण्यात येणार होती. पण या दरम्यान युपीएससी, नेट परीक्षा, एमपीएससीयासारख्या परीक्षा आल्याने विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
यूजीसीनं 30 ऑक्टोबरपर्यंत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 1, 5 आणि 9 ऑक्टोबरला नेट परीक्षा होणार आहे त्याचबरोबर 4 ऑक्टोबरला युपीएससीची परीक्षा होणार असून 11 ऑक्टोबरला एमपीएससीची परीक्षा होणार आहे.
तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे परीक्षांचे नियोजन करण्यात अडथळा निर्माण होत आहे.
SPPU EXAM: विद्यापीठातील कर्मचारी संपावर; अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणार?
त्यामुळे सर्व परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम वर्षाची परीक्षा 12 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.