उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या हाथरस बलात्कार घटनेतील पीडित मुलीच्या घरच्यांना भेटण्यासाठी निघाले असताना राहुल गांधी यांना कलम 188 अंतर्गत अटक करण्यात आले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निघाले होते. मात्र पोलिसांनी रस्त्यातच त्यांचा ताफा अडवला.
त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गाडीतून उतरून रस्त्याने चालू लागले. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा जमाव देखील जमला होता. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या वादावादीत राहुल गांधीना पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे. यामुळे राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य जनतेला काय सहन करावे लागत असेल असा सवाल देशभरातून विचारला जात आहे.
https://www.facebook.com/110021644100822/posts/166106591825660/?app=fbl
उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींवर कलम 188 अंतर्गत कारवाई करत अटक केली आहे.