सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं सध्या मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. विविध शहरात पुन्हा एकदा मोर्चे आयोजित होताना दिसत आहेत. मराठा नेत्यांनी याबाबतीत स्थगिती उठवण्याचा इशारा देखील दिला आहे. परंतु यावर खूप दिवसांपासून मार्ग निघत नसल्यामुळे बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्याने या चिठ्ठीत केला आहे.
बीडमधील केतुरा गावामधील ही घटना आहे. विवेक रहाडे या १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विवेक याने आत्महत्या का केली, याबाबत त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
काय आहे चिठ्ठीत?
‘मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच नीट परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल.’
याबाबत राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी या घटनेबद्दल राग व्यक्त करत ट्विट केलं आहे. ते म्हणाले की, “ही बातमी ऐकून धक्का बसला आहे.अशा दुर्दैवी घटना अशाच सुरू राहतील, त्याआधी यावरती मार्ग शोधला पाहिजे. यासाठी नेत्यांनी जागं व्हावं, लढावं. सरकारने यावर लवकर तोडगा काढावा अशी विनंती आहे.”
Devastated to hear of the tragic death of Vivek who committed suicide for the cause of Maratha reservations. Before a chain reaction of such unfortunate incident starts, Maratha leaders have to wake up & fight for this cause. Requesting Maha govt to step in to solve the crisis. pic.twitter.com/r8c3YQUoO0
— Parth Pawar (@parthajitpawar) September 30, 2020
२०१८ मध्ये देखील औरंगाबाद मधील एका युवकाने आरक्षणामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे यावरती लवकरात लवकर मार्ग निघणं घरजेच असल्याचं दिसतं आह.