फॅक्ट चेक: एकतर्फी प्रेमातून साताऱ्यातील काळज येथील लहानग्याची अपहरण करून हत्या, मात्र सोशल मीडियावर पसरवली जातेय अफवा
या आठवड्यात सातारा जिल्ह्यातील एका गावात लहान मुलाची अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली होती. सुरुवातीला आरोपी कोण? हे समजत नव्हतं, मात्र सातारा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. लहान मुलाच्या आईवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका तरुणाने सूडाच्या भावनेने हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. मात्र सध्या व्हॉट्सअपवर याबाबतीत चुकीची माहिती आणि अफवा फॉरवर्ड केली जाण्याची गंभीर चूक घडत असल्याचं दिसून येत आहे.
काय अफवा पसरवली जातेय?
यामध्ये अशी अफवा पसरवण्यात येत आहे की, या लहानग्या मुलाचं अपहरण हे त्याच्या आईनेच केलं असून तिच्या प्रियकराने यामध्ये तिची साथ दिली आहे. मात्र हे साफ चुकीचं असून अशी तथ्य नसलेली माहिती पसरवणं हे चुकीचं आहे.
काय आहे तथ्य?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या लहान मुलाच्या आईवर एका तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं, मात्र आईने त्या तरुणाला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता आणि या रागातून त्या तरुणाने लहान मुलाचं अपहरण करून दोन दिवसांनी त्याची हत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.
मात्र अशा घटनांबद्दल अशी चुकीची माहिती पसरवली जाणं चुकीचं आहे आणि याबद्दल जागरूकता होणं गरजेचं दिसत आहे.