देशभरात किर्ती मिळवलेल्या बारामती शहराच्या सौंदर्यात आणखीन भर पडणार आहे. बारामती जवळच्या कण्हेरी नजीक १०३ हेक्टर जागा विशेष पार्कसाठी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये वनउद्यान साकारलं जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प ऊभा राहणार आहे. या उद्यानात बटरफ्लाय गार्डन, चिंकारा पार्क, थीम गार्डन देखील असणार आहे.
बारामती शहरात एक छानसा पिकनिक स्पा्ॅट असावा, धावपळीच्या जीवनात लोकांना निवांत काही क्षण व्यतित करता यावेत या उद्देशाने याची ऊभारणी करण्यात येणार आहे. हे उद्यान कण्हेरी नजीकच्या वनविभागाच्या जागेत निर्माण होणार आहे. या जागेवर पूर्वीपासूनच चिंकाराचा नैसर्गिक अधिवास आहे. त्याचबरोबर ससे, खोकड, खार, लांडगा, तरस, घोरपड असे प्राणी आहेत. यासोबत गरूड, वेडा राघू, गांधारी, कापशी, तुरेवाला चंडोल, मोर, कावळा, तिकर, टिटवी, पाणकोंबडी, कोतवाल असे पक्षी देखील आधळून येतात. त्याचबरोबर अनेक झाडं आणि माखेल, पवन्या या जातीचे गवत देखील मोठ्या प्रमाणात आधळते. या गोष्टींमुळे वन्य जीव तसंच पर्यटक देखील इकडे आकर्षित होतील.
काय असेल योजना?
इथं मोठ्या प्रमाणात फुलपाखरं आढळून येत असल्यामुळे “बटरफ्लाय गार्डन” बणवण्यात येणार आहे. त्याचबरोबर तिथेच असलेल्या तळ्यामध्ये सुधारणा करून बोटींग सुरू करण्यात येणार आहे. लहान मुले, प्रौढ, महिला, जेष्ठ या सर्वांसाठीच काही ना काही नावीन्यपूर्ण केलं जाणार आहे. या सगळ्या गोष्टींवर काम करण्यात येणार आहे.
काय काय असणार उद्यानामध्ये?
हनी बी पार्क
बटरफ्लाय गार्डन
अॅम्फिथिएटर
सर्पोद्यान
चिंकारा पार्क
अशा अनेक गोष्टी आपल्याला इथं भविष्यात पाहायला मिळतील. त्यामुळं हे पार्क कधी पूर्ण होणार? याकडे बारामतीकरांचं लक्ष लागलं आहे.