एक बावीस वर्षीय नेपाळी महिला बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यासाठी तब्बल 800 किमी अंतर पार करून नागपूरमध्ये आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महीला उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एका व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी आली असल्याची माहिती पोलिसांनी याबाबत दिली.
त्या पुरुषाने या महिलेला पोलिसांकडे जाऊ नये अशी धमकी देखील दिली होती. मात्र त्यानंतर ही महिला कशीतरी तिकडून पळून आली. ती नागपूरमध्ये एका मैत्रिणीकडे आली आणि त्यानंतर मैत्रिणीने तिला झीरो एफआयआर फाइल करण्यास मदत केली.
या महिलेनं केलेल्य तक्रारीनुसार, ती नेपाळवरून जाॅबसाठी 2018 मध्ये भारतात आली होती. ती लखनऊमध्ये एका मैत्रीणीबरोबर फ्लॅटवर भाड्याने राहत होती. त्यानंतर या मैत्रिणीने तिची ओळख व्हिडीओ काॅलवर लखनऊमधीलच पण दुबईमध्ये साॅफ्टवेअर इंजिनीअर असणाऱ्या प्रवीण राजपाल यादव या तरुणाशी करून दिली.
यापुढं तिनंं असंही सांगितलं की तिने आपल्या मैत्रिणीकडे 1.5 लाख रुपये ठेवले होते आणि जेव्हा ते मागितले असता तिला मारहाण करुन त्रास देण्यात आला. मग नंतर याबाबतीत तिनं प्रवीण यादव याच्याकडं तक्रार केली. मग प्रवीण याने तिच्यासाठी लखनऊमध्ये हाॅटेल रुम बुक करुन तिथं शिफ्ट होण्यास सांगितलं.
त्यानंतर काही दिवसांनी आरोपी प्रवीण हा दुबईवरुन माघारी आला. तो पिडितेला हाॅटेलवर भेटला आणि तिला ड्रग्स देऊन तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
त्यानंतर आरोपीने तरुणीचे आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडीओज देखील काढुन घेतले होते. त्यानंतर आरोपीने तरुणीला फोटोज सोशल मिडीयावर अपलोड करुन वायरल करण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर मात्र ही तरुणी कशीतरी सुटून नागपूरला मैत्रिणीकडे आली आणि येथे तक्रार केली.
त्यानंतर आता पोलिस पथक त्यातील कागदपत्रे आणि पिडीतेसह रविवारी रात्री लखनऊला रवाना झाले
आहेत.