उत्तर प्रदेशातील हाथरस मधील दलित मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरण चांगलेच चिघळले आहे. या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पिडितेच्या कुटुंबाला शनिवारी भेटण्यासाठी जात असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी व महासचिव प्रियंका गांधी यांसोबत युपी पोलिसांनी धकाबुक्की केली होती. तर प्रियंका गांधींसोबत गैरवर्तन करण्यात आले होते.
यानंतर या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युपी पोलिसांनी प्रियंका गांधी यांची माफी मागितली आहे. एका पोलिसाने प्रियंका गांधींशी गैरवर्तन केल्याचे व्हायरल झालेल्या फोटो मधून समोर आले. हा फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी युपी पोलिसांवर टिका केली. अखेर या गैरवर्तनाप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांची माफी मागितली आहे.
तसेच “डीएनडी उड्डाणपुलावर प्रचंड गर्दीला नियंत्रित करताना प्रियंका गांधींसोबत घडलेल्या घटनेबद्दल नोएडा पोलीस खेद व्यक्त करत आहेत. पोलीस उपायुक्त कार्यालयाने याची स्वत:हून दखल घेतली आहे. एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर निश्चितपणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. महिलांचा सन्मान आमच्यासाठी महत्वाचा आहे, नोएडा पोलीस कटिबद्ध असल्याचे नोएडा पोलिसांनी ट्विट करत म्हणले आहे.
@noidapolice profoundly regrets the incident @priyankagandhi while handling an unruly crowd at the DND. The DCP HQ has taken suomotto cognizance of it & ordered an inquiry to be conducted by a senior Lady officer. We @noidapolice are committed to ensure safety & dignity of women.
— POLICE COMMISSIONERATE GAUTAM BUDDH NAGAR (@noidapolice) October 4, 2020
राहुल गांधी व प्रियंका गांधी हाथरसमधील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यास जात असताना नोएडातील डीएनडी पुलावर त्यांना रोखण्यात आले होते.
या घटनेनंतर नितीन राऊत यांनी ट्विटद्वारे “कायद्याचे जानकार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. पोलिसांच्या कार्यपद्धती मार्गदर्शिकेनुसार, कोणत्याही पुरुष पोलीस कर्मचाऱ्याला कोणत्याही महिलेला सार्वजनिकरित्या चुकीच्या पद्धतीने स्पर्श करता येत नाही. प्रियांका गांधी यांच्यासोबत घडलेली घटना कायदेशीर आणि सामाजिक दृष्ट्या योग्य आहे का? त्या पोलिसाला शिक्षा होईल का?,” असे प्रश्न उपस्थित केले होते.