हाथरसच्या घटनेने देश हादरलेला असताना परदेशात देखील याचे पडसाद उमटले आहेत. हाथरस घटनेतील पिडीत मुलीचा २९ तारखेला मृत्यू झाल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी घरच्यांच्या अनुपस्थित पिडीतेचा मृतदेह जाळला होता. यामुळे संपूर्ण देशभरातुन यूपी पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता.
ज्या प्रकारे उत्तर प्रदेश पोलिस पिडीतेच्या घरच्यांवर दबाव आणत आहेत या विरोधात तीव्र आंदोलने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर परदेशात देखील या घटनेच्या विरोधात आंदोलने करण्यात आली आहेत.
न्युयॉर्क आणि लंडन येथील भारतीय दूतावासबाहेर भारतीय लोकांनी आंदोलने केली आहेत. या आंदोलनात “We want justice” “Stop Rape” अश्या आशयाचे पोटर्स निषेध म्हणून दर्शविण्यात आले.
यामुळे ह्या घटनेला न्याय मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आंदोलने होत असताना, उत्तर प्रदेश पोलिस पिडीत मुलीच्या घरच्यांवर दबाव आणण्यापेक्षा त्यांना न्याय मिळवून देईल का असा प्रश्न देशभरातून विचारला जात आहे.