सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला चेन्नईविरुद्धच्या लढतीत दुखापत झाली आहे. हैदराबाद संघासाठी भुवनेश्वर हा महत्वाचा आणि हुकमी गोलंदाज होता. भुवनेश्वर कुमारच्या जांघेतील स्नायू दुःखल्यामुळे तो आता आयपीएल मधून बाहेर पडला आहे. २ ऑक्टोंबरला चेन्नविरुद्धच्या सामन्यामध्ये १९ व्या षटकादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती आणि तो लंगडत मैदानाबाहेर पडला होता. भुवनेश्वर ६ ते ७ आठवडे क्रिकेटपासून दूर राहील.
यंदाच्या हंगामातील भुवनेश्वरची कामगिरी समाधानकारक होती. तरी भुवनेश्वर हा यूएईमध्येच थांबण्याची शक्यता आहे, कारण बीसीसीआयच्या मेडिकल टीमचा भाग असलेले भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल हे तिथेच आहे. यामुळे उपचारासाठी मदत होईल. याचबरोबर दिल्ली कॅपिटल संघाला पण मोठा झटका बसला आहे. ३ ऑक्टोंबर ला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यामध्ये स्वत:च्या बॉलिंगवर कॅच घेताना मिश्राच्या बोटाला दुखापत झाली.
ही दुखापत गंभीर असल्याचं एक्सरे चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं. यासोबतच दिल्ली डेअर डेविल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राला देखील दुखापत झाली आहे. यामुळे तो देखील आयपीएल मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अमित मिश्रा दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएल स्पर्धेत तब्बल तीन वेळा हॅट्ट्रिकचा मोठा विक्रम मिश्राच्या नावावर आहे.