सध्या सोशल मीडियावर शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचा मृत्यू झाल्याची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
फेसबुकवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे कविता करकरे यांचा निधन झालं आहे. कविता करकरे या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या पत्नी होत्या.
https://www.facebook.com/100004300807133/posts/1731509503669060/?app=fbl
https://www.facebook.com/100002235605076/posts/3321652151252606/?app=fbl
तसंच पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की कविता करकरे यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. तरीदेखील त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर रविवारी त्यांचा मेंदू मृत म्हणून घोषित करण्यात आला. पण दुर्दैवाने सोमवारी त्यांचं निधन झालं. निधनानंतर कविता करकरे यांच्या मुलांच्या परवानगीने किडनी, यकृत, डोळे यांचं अवयव दान करण्यात आलं.
व्हायरल झालेल्या या पोस्ट खऱ्या आहेत का ते तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यात असं आढळून आलं की कविता करकरे यांचा मृत्यू 2014 मध्येच झाला आहे. एनडीटीव्हीने 29 सप्टेंबर 2014 ला या विषयीची बातमी प्रसिद्ध केली होती. हेमंत करकरे यांच्या पत्नीचं निधन 29 सप्टेंबरला सोमवारी सकाळी झालं होतं.
तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी कविता करकरे यांचं अवयव दान करण्याचा देखील निर्णय घेतला होता. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा खरा असला तरी कविता करकरे यांचे निधन 2014 मध्येच झालेलं आहे.
त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा निधन 2014 मध्ये झालं आहे आणि त्याच्या निधनाची बातमी पुन्हा 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केली जाते, यामागचे नेमके कारण काय आहे हे अजूनही समजलेले नाही.