आयपीएल १३ व्या हंगामातील २१ वा सामना काल (७ ऑक्टोंबर) खेळण्यात आला. हा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात झाला. मात्र यात ५ वर्षे आणि ६९ सामन्यानंतर कोलकाताने चेन्नविरुद्ध नाणेफेक जिंकून पहिल्यांदाच सामना जिंकला. याआधी २०१५ साली कोलकाताने चेन्नई विरुध्दच्या सामन्यात पहीली फलंदाजी केली होती.
कोलकाता नाईट रायडर्स ने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.गेल्या ५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५ वर्षे आणि तब्बल ६९ सामन्यांनंतर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत मैदानावर उतरला. कोलकाता संघाने २० षटकात १० विकेट्स गमावत १६७ धावा केल्या.
चेन्नई ने १६७ धावांचा सामना करताना ५ विकेट्स गमावत फक्त १५७ धावा केल्या. कोलकाता संघाने हा सामना १० धावांनी विजयी केला.