अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलचे अकरावे डीन होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. या काळात दोन भारतीयांना डीन होण्याचा मान मिळाला आहे. श्रीकांत दातार यांच्या अगोदर ही कामगिरी नितीन नोहारिया यांनी बजावली होती.
श्रीकांत दातार 112 वर्षापासून आपली प्रतिष्ठा राखलेल्या हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीन पदाची जबाबदारी एक जानेवारीपासून सांभाळणार आहेत.