19 वर्षीय असलेली पोलंडची इगा शियाँतेकने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम जिंकून इतिहास रचला आहे. इगा शियाँतेक आता वर्ल्ड रँकिंगमध्ये ५४ व्या क्रमांकावर आहे. या क्रमांकावर असणाऱ्या कुठल्याच खेळाडूने आजवर फ्रेंच ओपन जिंकलं नव्हतं. मात्र ईगाने फ्रेंच ओपन जिंकत इतिहासात नव्या विक्रमाची नवीन नोंद केली आहे.
याचबरोबर हा किताब जिंकणारी इगा शियाँतेक ही पोलंडमधील पहिली खेळाडू ठरली आहे. अंतिम सामन्यात इगाने ६-४, व ६-१ अश्या सेटने सोफियावर मात केली.
हा सामना जिंकल्यानंतर समोर भाषणात इगा म्हणते “मी सर्वप्रथम हेच सांगते की, मला भाषण करायला येत नाही. कारण मी शेवटचा सामना दोन वर्षांपूर्वी जिंकला होता. पण मला खरंच आज काय बोलावं आणि कुणाकुणाचे आभार मानावे हे सूचत नाही.”
अशा कोरोणाच्या विळख्यात अडकलेल्या जगात आणि येवढ्या मोठ्या संकटाच्या काळातही ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचे तिने आभार मानत भावना व्यक्त केल्या.
तसेच इगा पुढे बोलाताना म्हणाली की, “हा क्षण माझ्यासाठी सर्वात सुंदर आहे. कारण दरवर्षी मी रफाल नदालला ट्रॉफी उचलताना पाहिलं आहे आणि आज मी त्या ठिकाणी आहे” असे बोलून तिने आनंद व्यक्त केला आणि पोलंडवासियांचेही आभार मानले.