मागील वर्षी आरेच्या जंगल तोडीमूळे मुंबई आणि महाराष्ट्रातील वातावरण बरेच तापले होते. मेट्रोच्या नियोजित प्रकल्पासाठी मुंबईतील आरे जंगलातील झाडं रातोरात तोडण्यात आली होती. याविरोधात मुंबईकरांनी जोरदार विरोध दर्शवत सरकार विरोधात आंदोलने केली होती.
या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक आंदोलकांवर गुन्हे देखील नोंदवण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो प्रकल्प दुसरीकडे नेण्यात येणार असल्याची माहीती दिली आहे. यासोबत मागील वर्षी आंदोलनावेळी ज्या आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होतो, त्यांच्या वरील गुन्हे मागे घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
आरेचं जंगल म्हणजे मुंबईला ऑक्सिजन पुरवणारे फुफ्फुस समजले जाते. यामुळे संपुर्ण मुंबईकरांनी याविरोधात एकजुटीने आंदोलन केले होते. अखेर याला यश आले आहे. मुंबई मेट्रोसाठी कंजुरमार्ग येथील सरकारी जागा निश्चित करण्यात आली आहे.