आयपीएलच्या हंगामात सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. तर हंगामात सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. आयपीएलमध्ये एकूण २८ सामने झाले असून, या २८ सामन्यांनंतर ऑरेंज कॅप सुरुवातीपासून किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलकडेच आहे. तर पर्पल कॅप दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज कागिसो रबाडा या गोलंदाजाकडे आहे.
चला तर पाहू या ऑरेंज कॅप च्या शर्यतीमध्ये सध्या कोणते फलंदाज आहेत.
(१) केएल राहुल- एकूण ३८७ धावा, ७ सामने.
(२) मयंक अगरवाल – एकूण ३३७ धावा, ७ सामने.
(३) फाफ डुप्लेसिस –एकूण ३०७ धावा, ७ सामने.
(४) डेविड वॉर्नर – एकूण २७५ धावा, ७ सामने
(५) जॉनी बेअरस्टो – एकूण २५७ धावा, ७ सामने.
आता पाहू या पर्पल कॅपच्या शर्यतीत असणारे गोलंदाज.
(१) कागिसो रबाडा – एकूण १७ विकेट्स, ७ सामने.
(२) जसप्रीत बुमराह –एकूण ११ विकेट्स, ७ सामने.
(३) ट्रेंट बोल्ट – एकूण ११ विकेट्स, ७ सामने
(४) राशिद खान –एकूण १० विकेट्स, ७ सामने.
(५) युझवेंद्र चहल- एकूण १० विकेट्स, ७ सामने.
हे आहेत या हंगामातील सर्वात जास्त विकेट्स घेणारे गोलंदाज. तर मुंबई इंडियन्स हा संघ सर्वाधिक गुणांसह पहील्या क्रमांकावर आहे, यासोबच सर्वात शेवटच्या स्थानावर किंग्स एलेव्हन पंजाबचा संघ आहे. विशेष म्हणजे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहील्या क्रमांकावर केएल राहूल, आणि दुसऱ्या क्रमांकावर मयंक अगरवाल आहे. तरी देखील पंजाबचा संघ शेवटच्या स्थानी आहे.