भारतात गेल्या चार महिन्यात कोरोनामुळे 18 हजार टन जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला असून, यामध्ये सर्वाधिक ( तीन हजार 587 टन ) कचरा महाराष्ट्रात निर्माण झाला असल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ( सीपीबी ) च्या आकडेवारीवरून मिळाली आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आलेल्या माहितीच्या आधारे प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
जून पासून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 18 हजार सहा टन कोरोना जैववैद्यकिय कचरा निर्माण झाला आहे. हा सर्व कचरा गोळा करून यावर देशातील 118 जैववैद्यकिय कचरा व्यवस्थापन केंद्रांमध्ये प्रक्रिया केली जात आहे. कोरोना जैववैद्यकिय कचऱ्यामध्ये वापरलेले पीपीई किट, मास्क, बुटावरील प्लॅस्टिकचे आवरण, ग्लोव्हज, रक्ताने दूषित वस्तू, पिशव्या, सुया, सिरिंज आदी गोष्टींचा समावेश होतो.
आरोग्य सुविधा, विलगीकरण केंद्रे, घरे, नमुने जमा करण्याची केंद्रे, प्रयोगशाळा, प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक प्रशासन या ठिकाणी हा कचरा हाताळणे, प्रक्रिया, विल्हेवाट लावण्याबाबबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्चमध्ये विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी Covid19 बिडब्लू एम हे ऍप सुधा मंडळाने विकसित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रदूषण मंडळांना हे ऍप वापरणे बंधनकारक केले आहे.
देशात निर्माण झालेला कोरोना जैववैद्याकिय कचरा
जून ते सप्टेंबर – 18006 टन
फक्त सप्टेंबर – 5490 टन