सध्या इंटरनेटवर जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमावले जातात, हे अनेक जणांना माहीत असेलच. जेव्हा आपण युट्यूबवर एखादी व्हिडिओ पाहतो, त्याच्या दरम्यान आपल्याला जाहिराती पाहायला मिळतात. त्याचे काही पैसे व्हिडीओ तयार करणाऱ्याला मिळतात तर काही पैसे युट्यूबला मिळतात.
अनेक जण फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करतात. फेसबुकवर आपल्याला वेगवेगळ्या जाहिराती पाहायला मिळतात. जेव्हा एखाद्या पोस्टच्या खाली ‘Sponsored’ असं लिहिलेलं असतं, तेव्हा ती जाहिरात असते. या जाहिरातीवर जेव्हा आपण क्लिक करतो, तेव्हा त्याचे पैसे फेसबुकला मिळत असतात.
पण फेसबुकचीच मालकी असणाऱ्या आणि जगभरात दोनशे कोटींपेक्षा जास्त ग्राहक असणाऱ्या व्हाट्सअपला कसं पैसे मिळतात? याचे उत्तर अनेक जणांना माहीत नसेल.
व्हाट्सअपवर जाहिराती दिसत नाही तरी ते पैसे कसे कमवतात?
जेव्हा आपण व्हाट्सअप चालवतो, तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारची जाहिरात दिसत नाही. तसंच एखाद्याला मेसेज, डॉक्युमेंट, व्हिडिओ किंवा फोटो पाठवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
त्यामुळे व्हाट्सअपवर जाहिराती दिसत नाही, तरी ते पैसे कसे कमवतात, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमचा डेटा. व्हाट्सअप तुमच्या ‘डेटाच्या’ माध्यमातून पैसे कमवतं. व्हाट्सअपवर आपण प्रोफाइल तयार करतो, तेव्हा आपण जन्मतारीख तसंच आपला फोटो आणि काहीतरी स्टेटस टाकत असतो. ही माहिती व्हाट्सअपच्या सर्व्हरला साठवलेली असते.
तुमची चॅटिंग गुगल ड्राईव्हला साठवली जाते
व्हाट्सअपवर तुमच्या चॅटींगचा बॅकअप घेण्याची सुविधा आहे गुगल ड्रायव्हर तुमची चॅटिंग साठवली जाते. जेव्हा तुम्ही इतरांसोबत चॅटिंग करत असता, त्याचा बॅकअप गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून साठवला जातो.
महत्त्वाचं म्हणजे या डेटाच गुगलला देखील फायदा होतो. कारण चॅटिंग बॅकअप घेण्यासाठी गुगल ड्राईव्ह वापर केला जातो. आणि गुगलच्या पॉलिसीनुसार ते लोकांच्या डेटाचा वापर करू शकतात.
मात्र अनेक जणांना व्हाट्सएपच्या इंस्क्रीप्शन या सुविधेविषयी माहिती असेल.
जेव्हा तुम्ही इंस्क्रीप्शन सुविधेच्या माध्यमातून चॅटिंग करता, तेव्हा तुमची चॅटिंग तिसर्या व्यक्तीला समजत नाही किंवा त्याला पाहता येत नाही.
पम तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की व्हाट्सअप चॅटिंगला इंक्रीप्शन असतं, तर आपण काही चॅट करतो याची माहिती व्हाट्सअपला कशी होते? तर यासाठी तुम्हाला इंक्रीप्शन म्हणजे नक्की काय असतं, हे समजून घ्यावं लागेल
इंक्रीप्शन म्हणजे नक्की काय?
व्हाट्सअपला इंक्रीप्शनची सुविधा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेसेज करता, तेव्हा तो मेसेज समोरच्या व्यक्तीला आहे असा जात नाही. त्या मेसेजची ठराविक कोडच्या मदतीने मोडतोड केली जाते.
जेव्हा तो मॅसेज समोरच्या व्यक्तीला पोचतो, तेव्हा मोडलेला मॅसेज पुन्हा जोडला जातो. या पद्धतीमुळे दोन व्यक्तींच्या व्यतिरिक्त कोणालाही चॅटिंग पाहता येत नाही. पण ही चॅटिंग आपण गुगल ड्राइव्हवर साठवू शकतो आणि इथेच खरी गंमत आहे.
गुगल ड्राईव्हचा वापर आणि इंक्रीप्शन
जेव्हा तुमच्या चॅटींगचा बॅकअप गुगल ड्राईव्हला सेव्ह केलेला असतो, तेव्हा ती माहिती गुगलला उपलब्ध होते. गुगलच्या पॉलिसीनुसार तुमची माहिती सुरक्षित ठेवली जाते. पण ती माहिती कशी वापरायची, याचा अधिकार गुगलला असतो.
थोडक्यात सध्याच्या काळात एखाद्या व्यक्तीची माहिती अर्थात डेटा पैशापेक्षा जास्त मूल्यवान झाला आहे. कारण तुमच्याबद्दल स्वतःला जेवढी माहिती नसेल, एवढी माहिती फेसबुक, गुगल, युट्युब, व्हाट्सअप यासारख्या कंपन्यांना आहे.
व्हाट्सअपच्या जिवावर फेसबुक आणि जिओमध्ये करार
काही दिवसांपूर्वी फेसबुक आणि जिओमध्ये एक करार झाला आहे. या करारामुळे फेसबुकची मालकी असणाऱ्या व्हाट्सअपच्या आणि जिओच्या मदतीने लोकांना ऑनलाइन शॉपिंग करता येणार आहे.
व्हाट्सअपचा पेमेंट ॲप म्हणून वापर
लवकरच व्हाट्सअप पेमेंट ॲप म्हणून देखील वापरता येणार आहे. या सुविधेची सध्या ब्राझील देशात चाचणी घेण्यात येत असून लवकरच भारतात देखील सुरू होईल. याच्या माध्यमातून देखील व्हाट्सअपला पैसे मिळतील.
त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की फेसबुक किंवा गुगलने तुमच्या माहितीचा वापर करू नये तर व्हाट्सअपसाठी गुगल ड्राईव्ह बॅकअपचा ऑप्शन बंद करणं कधीही फायदेशीर ठरेल.-