महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयानं पोलीस मारहाण प्रकरणात तीन महिन्यांची शिक्षा तसेच १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अंबादेवी मंदिराजवळ आठ वर्षांपूर्वी उल्हास रौराळे या पोलिस कर्मचाऱ्याला त्यांनी आणि त्यांच्या कारचालकाने व दोन कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तब्बल आठ वर्षांनी न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी केली आहे.
तसेच कारचालक आणि दोन कार्यकर्त्यांनाही दोषी ठरवतं गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात फितूर साक्ष देणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की काही न्यायालयाच्या निर्णयावर जास्त काही बोलणार नाही. मी हायकोर्टात अपील करणार आहे. तसंच भाजप आपलं राजकीय आयुष्य संपवत असल्याचा आरोप त्यांनी केला.