आयपीएलचा ३१ वा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन संघात झाला. सामना किंग्स इलेव्हन पंजाबने ८ विकेट्सने जिंकला. बेंगलोर संघाचा पराभव झाला असला तरी कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला.
आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी विराटने २०० वा सामना खेळला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी २०० सामने खेळणारा विराट कोहली पहिलाच खेळाडू ठरला आहे.
विराट कोहलीला विचारले असता तो म्हणाला की , “माझ्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ खूप महत्त्वपूर्ण आहे. संघासाठी २०० सामने खेळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. २००८ मध्ये मी कधीच विचार केला नव्हता की, असे होईल. ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आतापर्यंत ८ सामने खेळले असून ५ सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. तर ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला. आयपीएलच्या पॉईंट्स टेबल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.