दिनेश कार्तिकने थोड्याच वेळापूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व काही कारणास्तव दिनेश कार्तिकने सोडलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा आजचा सामना यंदा आयपीएलमध्ये बलाढ्य आणि जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्स या संघासोबत होणार आहे. अशातच कार्तिकने कोलकाता संघाचं नेतृत्व सोडून टीमला मोठा धक्का दिला आहे.
कोलकाता संघाला पहिल्याच सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता सर्व टीममध्ये चिंतेच वातावरण आहे. संघाचे नेतृत्व सोडून कार्तिक आता फलंदाजीकडे लक्ष केंद्रित करणार आहे आणि संघाचं पुढील नेतृत्व विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गनकडे सोपविले आहे.
? "DK and Eoin have worked brilliantly together during this tournament and although Eoin takes over as captain, this is effectively a role swap," says CEO and MD @VenkyMysore #IPL2020 #KKR https://t.co/6dwX45FNg5
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 16, 2020
कार्तिकने ही माहीती संघ व्यवस्थापनाला कळवली, यानंतर कोलकाता संघाने ही माहिती ट्विट करुन आपल्या चाहत्यांना कळवली. दरम्यान कोलकाता संघाने ७ सामने खेळून ४ सामन्यात विजय मिळवला आहे. यामुले कोलकाता संघ ८ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.