भारतीय संघाचा कर्णधार रन मशीन विराट कोहली मैदानातील वर्तणूकीमुळे नेहमीच चर्चेत असतो. विराट मैदानात काहीतरी भन्नाट गोष्टी करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. यावेळेस मात्र विराटचा चक्क मैदानात लोळून डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चनने ट्विट केला आहे.
यात त्याने “जेव्हा तुम्हाला ती म्हणते जा आणि दरवाजा बंद कर म्हणते” असं भन्नाट कॅप्शन दिलं आहे. बंगलोर संघ सराव करत असताना विराटने असा भन्नाट डान्स केला आहे.
When she tells you go and lock the door https://t.co/5bHI9FZxgD
— Jofra Archer (@JofraArcher) October 15, 2020
विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचे प्रतिनिधत्व करत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचा संघ चांगली कामगीरी करत असुन गुणतालिकेत ३ ऱ्या क्रमांकावर आहे. बंगलोर संघाने ८ सामने खेळून त्यात ५ विजय मिळवले आहेत.
वाचा – कोहलीने केला आणखी एक नवा विक्रम!