कोरोनाच्या काळातील आयपीएलचा सर्वाधिक रोमांचक सामना काल (१७ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघात पार पडला. शारजाह येथे पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर ५ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
दिल्ली संघाकडून तुफानी फलंदाजी करत शिखर धवननं आयपीएल करियरमधील पहिलं शतक झळकावलं. अवघ्या ५८ चेंडूत धवनने हा पराक्रम केला. शेवटच्या ओव्हर मध्ये अक्षर पटेलनं ३ षटकार मारत दिल्ली संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करत चेन्नईनं २० षटकात ४ विकेट्स गमावत १७९ धावा काढल्या. चेन्नईच्या या धावांचा सामना करताना दिल्ली कॅपिटल संघानं ५ विकेट्सच्या बदल्यात १९.५ षटकात १८५ धावा केल्या. चेन्नईवर मात करत दिल्ली कॅपिटल्सनं हंगामातील ७ वा विजय नोंदवला आहे.
दरम्यान १४ गुणांसह दिल्ली पॉइंट टेबल मध्ये पहिल्या स्थानावर आहे. सामना खेळताना खराब क्षेत्ररक्षण केल्यानं चेन्नईला या सिझनमधल्या ६ व्या पराभवाला तोंड द्यावं लागलं आहे.
हे पण वाचा:
- ‘बलात्काराच्या घटना थांबवायच्या असतील तर मुलींना चांगले संस्कार लावा’ भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान (2)
- ‘मला माझ्या मुलीचा चेहरा ही पाहू दिला नाही’ हाथरस प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया (2)
- भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध वेषभूषाकार भानु अथैया काळाच्या पडद्याआड (2)
- हाथरस बलात्कार प्रकरण: ‘युवतीची जीभ कापली नाही ना मणक्याचं हाड मोडलं’ (2)