भारतातील 23 वर्षीय ऐश्वर्या श्रीधर यांना 2020 चा ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द ईयर’ पुरस्कार मिळाला आहे. अंधारात आणि चांदण्यांच्या प्रकाशात काढलेल्या काजव्यांच्या फोटोसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इअर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर पुरस्कारासाठी जगभरातील 80 विविध देशातून 50 हजार स्पर्धकांनी आपले फोटो पाठवले होते. शेवटी 100 फोटो निवडण्यात आले व त्यातून ऐश्वर्या श्रीधर यांची वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
अंधाऱ्या आकाशात ताऱ्यांच्या मार्गाचा फोटो काढण्यासाठी स्टार ट्रेल नावाचं तंत्रज्ञान वापरलं जातं. याच तंत्राचा वापर करून ऐश्वर्या श्रीधर यांनी काजव्यांचा फोटो काढला.
व्यवसायाने फोटोग्राफर, फिल्ममेकर तसचं लेखिका असणाऱ्या ऐश्वर्या श्रीधर या पर्यावरण रक्षणाचं देखील काम करतात.
दरवर्षी लंडन येथे वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर निवडण्याचा सोहळा असतो. हा पुरस्कार नॅशनल हिस्ट्री म्युझियमकडून जाहीर करण्यात येतो.