काल रविवारी दोन सामने झाले होते. पहिला सामना हा सनरायझर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात झाला. आणि दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या दोन संघात सामना झाला होता.
या सामन्यात “ह्या” ब्लॉकबस्टर गोष्टी घडल्या
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. मुंबई इंडियन्स ने ६ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत पंजाबनेही ६ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या. आता सामना बरोबरीचा झाला होता आणि यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार होती. दोन्ही संघाच्या धावा सारख्याच झाल्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबने २ विकेट्स गमावत ५ धावा काढल्या. या धावांचा सामना करताना मुंबई संघानेही ५ धावाच केल्या,मात्र पुन्हा सामना बरोबरीचा झाला होता.
सामना नक्की जिंकणार कोण?
सामना एवढा रोमांचकारी झाला की, दोन्ही संघाच्या फॅन्सनी तोंडात बोट घातली.पहील्या सुपर ओव्हरमध्ये देखील धावा सारख्या झाल्यामुळे दूसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ११ धावा केल्या. पंजाबच्या फलंदाजांनी २ चौकार आणि एक षटकार मारत सामना अखेर विजयी केला.
आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवशी दोन्ही सामन्याचे निकाल सुपर ओव्हर मध्ये लागले. तर दुसऱ्या सामन्यात हैद्राबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करत ५ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या.
या सामन्याआधी झालेल्या सामन्यात हैद्राबादच्या संघानेही ६ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या. त्यामुळे सामना बरोबरीचा झाल्याने अंतिम निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करत हैद्राबाद संघांनी २ विकेट्स गमावत फक्त २ धावा केल्या. या धावांचा सामना करत कोलकाता नाईट रायडर्स संघांनी सहज ३ धावा काढत सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.
यामुळे कालच्या दोन सामन्यात एकूण ३ सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. यामुळे क्रिकेटप्रेमींना कालचा दिवस परिपुर्ण मनोरंजनाचा होता.