कोरोना व्हायरसने आधीच हैराण असलेल्या अमेरिकेवर आता त्सुनामीचे नवे संकट चालुन आलेले आहे. सोमवारी अलास्काच्या किनाऱ्यावर ७.५ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे तेथील रहिवाशी लोकांना सुरक्षित ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. काही ठिकाणी १.५ ते २ फूट उंच त्सुनामीच्या लाटा देखील आल्या आहेत. त्यामुळेच या परिसरात त्सुनामीचा इशारा ( Tsunami alert issued) देण्यात आलाय.
हा भूकंप सँड पॉइंट शहरापासून ९४ कि.मी. अंतरावर जमिनीपासून ४१ किमी खाली होता. केनेडी या प्रवेशद्वारापासून ते युनिमॅक पासकडे त्सुनामीचा इशारा देण्यात आला. नॅशनल ओशिएनिक अँड वायुमंडलीय प्रशासन (NOAA) यांनी असं सांगितले की, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धक्क्याची तीव्रता ७.४ एवढी होती. अलास्का भूकंप केंद्राच्या मते, पहिल्या भूकंपानंतर आणखी दोन भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता ५ रिश्टर स्केल्पेक्षा पेक्षा जास्त होती.
या भागातील लोकांंना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने लोकांना असा इशारा दिला आहे की शक्तिशाली लाटा किनाऱ्यावर येऊन आपटण्याच्या शक्यता आहे. लोकांनी सतर्कता म्हणून किनाऱ्यापासुन दुर राहावे. सँड पॉईंटच्या काही भागात त्सुनामीच्या छोट्या लाटा दिसल्या.