कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) इंजिनीअरिंगच्या नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ डिसेंबरपासून सुरू करण्यास मान्यता दिली. याआधीच्या वेळापत्रकाप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश एआयसीटीईने दिले होते. परंतु राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता आहे तसेच काही ठिकाणातील कॉलेजेसचे निकाल आणखी जाहीर केले नसल्याने ही तारीख पुढे वाढवण्यात आली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास उशीर होत आहे.
यामुळे परिणामी हे वर्ग आता १ डिसेंबरपासून सुरू करावेत, असे आदेश परिषदेने दिले आहेत. सर्व इंजिनीअरिंग कॉलेजे, तसेच आयआयटी आणि एनआयटीमधील प्रवेश ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
इंजीनिअरिंगसोबतच इतर ( डिप्लोमा फार्मसी आर्किटेक्चर) फॅकल्टीला ही हे वेळापत्रक लागू होईल असेल असेही त्यात स्पष्ट केले आहे.