राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहन वडमारे आणि रोहीत वडमारे यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लातुर जिल्हातील त्यांच्या मामाच्या गावातील तलावात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील क्रिडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
दोघेही गावातील तलावात पोहण्यासाठी गेलेले होते. रोहित पाण्यात बुडत असल्याचे रोहन वडमारेच्या लक्षात आले. यामुळे रोहन हा रोहितला वाचवण्यासाठी पाण्यात गेला. परंतु, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. या दोघांसोबत गावातील अजुन एका मुलाचाही बुडून मृत्यू झाला आहे.
हॉकीमध्ये राष्ट्रीय पातळीवर दोघांनीही महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. हे दोघेही राष्ट्रीय खेळाडू प्रियांका व प्रीती वडमारे हीचे भाऊ आहेत. ज्ञानदीप विद्यालयाच्या हॉकी संघाकडून दोघांनीही अनेक वर्षे मैदान गाजवले होते. ज्ञानदीप विद्यालयाताच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. मागील वर्षी रोहन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हॉकी संघाकडून खेळला होता आणि रोहित हा यंदाच दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला होता