भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला असून ते राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चर्चा होत होत्या. आता उद्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश होणार आहे.
Eknath Khadse promoted BJP in Maharashtra over years. I've been informed that BJP Leader Eknath Khadse has resigned from his party. We've decided to give him an entry in NCP. He will be formally inducted into NCP at 2 pm on Friday: Jayant Patil, NCP Leader & Maharashtra Minister pic.twitter.com/3o1STFi7IH
— ANI (@ANI) October 21, 2020
तसंच आपण भाजप पक्षावर नाराज नसल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. ‘मी देवेंद्र फडवणीस यांच्यामुळे पक्ष सोडत आहे,’ असं पत्रकार परिषदेत ते स्पष्टपणे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर खोटा विनयभंगाचा खटला दाखल करण्यास सांगितल्याचं देखील ते म्हणाले.
2016 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवत त्यांना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून पक्षाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं बोललं जात होतं.