भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला असून ते राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चर्चा होत होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून उद्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ‘उद्या दुपारी २ वाजता आपल्या काही समर्थकांसह एकनात खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासारखा नेता आमच्या पक्षात येतोय ही आनंदाची बाब आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
तसंच राज्यात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, पक्षात त्यांच्यावर अन्याय झाला. त्यामुळंच त्यांनी हा निर्णय घेतला आहे,’ असंही यावेळी जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अनेक वेळा खडसेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. कारण भाजप पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा असताना देखील मागील विधानसभेला त्यांचं तिकीट कापण्यात आले होते. या पक्षाअंतर्गत कुरघोडींना कंटाळून भाजपला रामराम ठोकत असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.