राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र पार्थ पवार यांनी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं सांगितले आहे. त्यांना फक्त थोडा ताप आणि किरकोळ ताप असल्याचे त्यांनी दौरे रद्द करुन विश्रांती घेत असल्याचे देखील पार्थ पवार म्हणाले.
अजित दादा नेहमीच आपल्या कामाच्या पध्ततीमुळे चर्चेत असतात, कोणत्याही कामाच्या ठिकाणी ते वेळेच्या आधी उपस्थित असतात. कोरोना काळात देखील त्यांनी पायाला भिंगरी बांधून लोकांची कामे केलेली होती.
दरम्यान, अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या अनेक माध्यमांनी दिल्या आहेत. मात्र, अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार यांनी या बातम्या खोट्या असल्याचं सांगितले आहे. त्यांनी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं एका वृत्तवाहिनीला सांगितलं आहे.